PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 9, 2024   

PostImage

Gas booking : आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही गॅस सिलेंडर बुक करता येणार; …


मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागेल.ज्या कंपनीकडून तुम्ही गॅस खरेदी करता त्या कंपनीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करा. 

 

 *हे तीन कंपन्यांचे नंबर आहेत.* 

▪️HP GAS- 9222201122, 

▪️Indane- 7588888824  

▪️भारत गॅस- 1800224344

 

✅ सर्वप्रथम तुम्हाला नंबर सेव्ह करून HI लिहावे लागेल. 

✅त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल. 

✅ यानंतर, तुम्ही येथून गॅस बुक, नवीन कनेक्शन, कोणतीही तक्रार इत्यादी सर्व काही करू शकता.

यासह तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील ज्यामधून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.

 

 गॅस रिफिल बुकिंग केल्यानंतर काही तासांनी एक नवीन सिलिंडर तुमच्याकडे येईल. लक्षात ठेवा, सेवा क्षेत्रानुसार विलंब होऊ शकतो.

 

 


PostImage

pramod abhiman raut

Sept. 15, 2023   

PostImage

Gas Agency Dealership : गॅस एजन्सी सुरू करून लाखों रुपये …


 

चिमूर प्रतिनिधी:-

          Gas Agency Dealership : प्रत्येकाच्या घरात आज स्वयंपाक करण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर करत आहे. देशात गॅस सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागात देखील चुलीचे प्रमाण कमी होऊन गॅसचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही देखील गॅस एजन्सी उघडून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायातून नोकरीपेक्षा जास्त कमाई होईल, असा हा व्यवसाय आहे.

        गॅस एजन्सीचे चार प्रकार आहेत. शहरी, ग्रामीण, दुर्गम आणि निमशहरी गॅस वितरक. जर तुम्हाला गॅस एजन्सी घ्यायची असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज सादर करावा लागेल. तसेच गॅस एजन्सी घेण्यापूर्वी तुम्हाला त्या क्षेत्राचे निरीक्षण करावे लागेल. म्हणजेच ती जागा कोणत्या परिसरातील आहे. जेणेकरून तुम्हाला त्या प्रकारच्या गॅस एजन्सीचा परवाना घेता येईल.
@@@@@@@@@@@@@@@@

lpg gas agency गॅस एजन्सी घेण्यासाठी पात्रता
         एलपीजी गॅस एजन्सी घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय असावा आणि त्याचे वय 21 ते 60 वर्षांदरम्यान असावे.
अर्जदार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी पास असणं गरजेचं आहे.
कुटुंबातील कोणताही सदस्य तेल विपणन कंपनीचा कर्मचारी नसावा. गॅस एजन्सीसाठी अर्ज करण्यासाठी, 10 हजार रुपये आकारल्या जातील परंतु, हे शुल्क तुम्हाला परत मिळणार आहे.
तसेच गॅस एजन्सी उघडण्यासाठी तुमच्यासाठी 15 लाख रुपये असणं आवश्यक आहे. हे पैसे संपूर्ण गॅस एजन्सी बनविण्यासाठी, वापरले जाईल.

एलपीजी गॅस कनेक्शनच्या या कंपन्या Gas Agency Dealership
        gas agency भारतामध्ये भारत गॅस, इंडियन गॅस आणि एचपी गॅस, या तीन सरकारी कंपन्या आहेत ज्या गॅस सिलिंडर उपलब्ध करून देतात. या सरकारी कंपन्यांकडून गॅस एजन्सी करिता जाहिरात काढण्यात येत असते. यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

गॅस एजन्सी कशी मिळवायची?
        गॅस एजन्सी मिळविण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. यासाठी तुम्हाला https://www.lpgvitarakchayan.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर अर्जदाराची मुलाखत घेतली जाईल. gas agency dealership 2023 मुलाखत घेतल्यानंतर चौकशी केल्या जाईल. चौकशी झाल्यानंतर लेटर ऑफ इंटर दिले जाते. यानंतर, तुम्हाला ज्या कंपनीची गॅस एजन्सी घ्यायची आहे, त्या कंपनीमध्ये तुम्हाला Security जमा करावी लागते. त्यानंतर, तुम्हाला तुमच्या नावावर गॅस एजन्सी दिली जाईल.